संतापजनक! ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर ; एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू

शुक्रवारी देखील या रुग्णालयात उपाचार न मिळाल्याने ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता
संतापजनक! ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर ; एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे महानगरपालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रोजी या रुग्णालयात उपाचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. तसंच या रुग्णालयात तपासणीसाठी वेळेवर डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषधोपचार केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या घडलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असून अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने एकाच रात्रीत १७ रुग्णांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. १७ पैकी १३ रुग्ण हे आयसीयूवार्डमधील तर ४ रुग्ण हे जनरल वार्डमधील होत. रुग्णालय प्रशानसनाने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. काही रुग्ण शेवटच्या क्षणी प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आल्याने तर काहींच वय ८० पेक्षा जास्त असल्याने हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सिव्हील रुग्णालय बंद झाल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असल्याने या रुग्णालयातील वैद्यकीय क्षमता कमी पडत आहे. १० तारखेला एकाच दिवशी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमादार जितेंद्र आव्हाड यांनी तसंच इतर पक्षांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली होती. आता रात्री १०:30 वाजेपासून सकाळी ८:30 वाजेपर्यंत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्टवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट कर रुग्णालया प्रशासनावर ताशेरे ओढळे होते. यावेळी त्यांनी रुग्णालयात सुरु असलेला प्रकार पाहून मी सुन्न झालो असून यामुळे तळपायाची आग मस्तकात गेल्याचं म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in