भाईंंदर : मीरारोड भागात कुटुंबीयांसह राहणारी मुलगी ही २०२२ मध्ये अल्पवयीन असताना तिच्या अल्पवयीन व अज्ञानाचा फायदा घेऊन आशिष चौरसिया (२२) याने तिला मुंबईच्या गोराई येथील लॉजमध्ये दोन वेळा नेले. तेथे तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केले. नया नगर पोलिसांनी फिर्यादीनंतर चौरसियाविरुद्ध पोक्सो, बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत मीरारोड भागातील अल्पवयीन मुलीला २०१९ सालापासून कृष्णा कांबळे याने अल्पवयाचा गैरफायदा घेत आधी तिच्याशी मैत्री केली, नंतर तिला प्रेम करतो, लग्न करू असे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केले. पीडितेच्या आईच्या फिर्यादीनंतर कांबळेविरुद्ध नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.