४७ वर्षीय शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, २० वर्षांची शिक्षा

पीडित एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन त्या इसमाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
मुंबईत अल्पवयिन मुलीवर बलात्कार
मुंबईत अल्पवयिन मुलीवर बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

ठाणे : दिव्यात राहणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका ४७ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित चार वर्षीय मुलगी शेजारी खेळण्यासाठी जात असे. शेजारी राहणारे ४७ वर्षीय इसमाचे पीडित मुलीच्या घरच्यांशी चांगले संबंध होते. पीडित एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन त्या इसमाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील घोसाळकर (कळवा) विभाग) व तपासपथक सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, पो. ह. देवेंद्र पवार, पो.ह. सुचिता देसाई, पो.ह. धनंजय घोडके, संतोष सस्कर, लीलाधर सोळुंके पो.ना. योगेश पाटील, पो.ह. विद्यासागर कोळी तसेच वपोनि ज्ञानेश्वर साबळे व संजय दवणे पो.नि. गुन्हे यांच्या मार्गदर्शनाने याचा तपास करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in