येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे २००आमदार निवडून येतील -भरत गोगावले

शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा किरवली येथील साईकृपा शेळके सभागृहात सपार पडला.
येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे २००आमदार निवडून येतील -भरत गोगावले

बाळासाहेबांनी भाजप-शिवसेनेची युती केली. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपची ताकद नव्हती तो त्यांनी विचार केला नाही कारण हिंदुत्वासाठी त्यांनी आपल्या पक्षाचा विचार केला नाही. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली असे श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केले.

कर्जत-खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा किरवली येथील साईकृपा शेळके सभागृहात सपार पडला. सुरुवातीला आदिवासी भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात केले. भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आम्ही गद्दारी केली नाही आम्ही उठाव केला. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडा असे उद्धव ठाकरे यांना सांगितले, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. खरी शिवसेना कोणती? आम्ही दुसरा पक्ष काढला नाही किंवा कोणत्या पक्षात गेलो नाही. पर्यावरण मंत्री व्हायला आदित्य ठाकरे यांचे काय योगदान आहे. हे त्यांना विचारा. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे २००आमदार निवडून येतील. असा विश्वास व्यक्त केला.

संतोष भोईर यांनी प्रास्ताविकात, खरे तर आपल्याला गद्दार म्हणून हिणवले जाते परंतु निवडणुकीत भाजप - शिवसेना लढली. असे वाटले होते परंतु कोणाची तरी नजर लागली. त्यावरून कोण गद्दार ते तुम्हीच ठरवा असे स्पष्ट केले. महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा ठाकरे आणि उप जिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी शिंदे गटाला समर्थन केल्याबद्दल त्यांचा उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

विजय पाटील, महेंद्र थोरवे यांनी, दोन महिन्यानंतर मी आज पूर्ण समाधानी आहे. ऐतिहासिक उठाव ५० आमदारांनी केला आणि विसंगाशी संग करून २०१९ साली सरकार सत्तेवर आले. मात्र नंतर तीन आमदार शिवसेनेचे आमदार होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असताना पक्ष प्रमुखांनी त्या आमदाराला पालकमंत्री केले. खरी गद्दारी कुणी केली? गद्दारी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी झाली. आम्हाला म्हणतात ५० खोके घेतले. आम्ही ते कसे घेऊ कारण आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत. आत्तापर्यंत ४०० ते ४५० कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा. मनोहर भोईर यांनी त्यांच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. त्यांना यावेळी ४० हजार मतांनी पडल्या शिवाय राहणार नाही असे आव्हान भोईर यांना केले. यावेळी व्यापीठावर खासदार श्रीरंग बारणे, पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, माजी सभापती अमर मिसळ, सुषमा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in