उरणच्या २२०० हेक्टर खारफुटींचे संरक्षण होणार

उरण तालुक्यातील खारफुटींचे क्षेत्र सुमारे २२०० हेक्टर पेक्षा जास्त असल्याचे उरणचे वन अधिकारी नथुराम कोकरे यांनी सांगितले.
उरणच्या २२०० हेक्टर खारफुटींचे संरक्षण होणार

उरण येथील महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या १९५ हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या खारफुटींना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समुद्री वनस्पतींना संरक्षित जंगलांच्या स्वरुपात वाचविण्यासाठी वनविभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. उरण तालुक्यातील खारफुटींचे क्षेत्र सुमारे २२०० हेक्टर पेक्षा जास्त असल्याचे उरणचे वन अधिकारी नथुराम कोकरे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील १७ गावांमधल्या १९५ हे. खारफुटींच्या भारतीय वन अधिनियमाच्या कलम ४ अन्वये नवीन स्थानांतरण करण्याचा गॅझेट आदेश दिनांक २८ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. याआधी महसूल विभागाने वन विभागाला २०१५ मध्ये २५ हेक्टरपेक्षा जास्त वनसंपत्ती सुपूर्द केली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ४२ हेक्टर आणि जुलैमध्ये ११०० हेक्टर स्थानांतरणाची सूचना देण्यात आली होती असे वन अधिका-यांनी सांगितले. या व्यतिरिक्त जेएनपीटीने ८१४ हेक्टरपेक्षा जास्त खारफुटी वन विभागाकडे सुपूर्द केली आहे. याबाबत ३०० हेक्टर्स एवढ्या खारफुटी बहुतांशपणे सिंचन न झालेल्या शेत जमिनींवर असून त्यांची सिडकोने दखल घेणे अजून बाकी आहे. याबद्दल सिडकोचे स्थानिक शेतक-यांसोबत मतभेद असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in