मयत इसमाच्या बँकेतील २३ लाख रुपये एटीएमद्वारे लंपास, फसवणुकीचा गुन्हा दाखल

एका इसमाने मयत इसमाच्या बँकेतील तब्बल २३ लाख रुपयांचा एटीएम कार्डद्वारे अपहार केल्याची तक्रार मयताच्या पत्नीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
मयत इसमाच्या बँकेतील २३ लाख रुपये एटीएमद्वारे लंपास, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Published on

उल्हासनगर : एका इसमाने मयत इसमाच्या बँकेतील तब्बल २३ लाख रुपयांचा एटीएम कार्डद्वारे अपहार केल्याची तक्रार मयताच्या पत्नीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार एकावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँरेक नंबर ९२, ए साईड-१२, बडेश्वर मंदीराजवळ, उल्हासनगर नंबर १ येथे ज्योती संजय भागवत (४३) ही महिला आपल्या परिवारासोबत राहते. तिचे पती संजय मधुकर भागवत यांना दारू पिण्याचे व्यसन होते. दारू सोडवण्यासाठी त्यांच्यावर संजीवनी रुग्णालय विरार येथे उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उल्हासनगर नंबर १ येथे राहणारे पुनित विनोद वाघ यांच्यासोबत ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत पुनित वाघ या भामट्याने संजय मधुकर भागवत हयात असताना त्यांच्याकडून एटीएम कार्ड व त्याचा पासवर्ड, चेकबुक, तसेच अकांऊट पासवर्ड अशी सर्व माहिती घेऊन व मयत झाल्यावर सुद्धा भागवत यांच्या बँकेतून तब्बल २३ लाख रुपयांपैकी काही रक्कम स्वतःच्या व बाकी ओळखींना ट्रान्सफर करून अपहार केला. तसेच भागवत यांनी दिलेली ३० हजार रुपये किमतीची साडेपाच तोळ्याची सोन्याची अंगठी सुद्धा हडप केली. ही बाब भागवत यांच्या पत्नी ज्योती भागवत यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन लिखित तक्रार दिल्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बिडगर हे करत आहेत.

एका इसमाने मयत इसमाच्या बँकेतील तब्बल २३ लाख रुपयांचा एटीएम कार्डद्वारे अपहार केल्याची तक्रार मयताच्या पत्नीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार एकावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँरेक नंबर ९२, ए साईड-१२, बडेश्वर मंदीराजवळ, उल्हासनगर नंबर १ येथे ज्योती संजय भागवत (४३) ही महिला आपल्या परिवारासोबत राहते. तिचे पती संजय मधुकर भागवत यांना दारू पिण्याचे व्यसन होते. दारू सोडवण्यासाठी त्यांच्यावर संजीवनी रुग्णालय विरार येथे उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उल्हासनगर नंबर १ येथे राहणारे पुनित विनोद वाघ यांच्यासोबत ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत पुनित वाघ या भामट्याने संजय मधुकर भागवत हयात असताना त्यांच्याकडून एटीएम कार्ड व त्याचा पासवर्ड, चेकबुक, तसेच अकांऊट पासवर्ड अशी सर्व माहिती घेऊन व मयत झाल्यावर सुद्धा भागवत यांच्या बँकेतून तब्बल २३ लाख रुपयांपैकी काही रक्कम स्वतःच्या व बाकी ओळखींना ट्रान्सफर करून अपहार केला. तसेच भागवत यांनी दिलेली ३० हजार रुपये किमतीची साडेपाच तोळ्याची सोन्याची अंगठी सुद्धा हडप केली. ही बाब भागवत यांच्या पत्नी ज्योती भागवत यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन लिखित तक्रार दिल्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बिडगर हे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in