भिवंडीत २४ तास पाणीपुरवठा खंडित

स्थानिकांनी महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडीत २४ तास पाणीपुरवठा खंडित
Published on

भिवंडी : शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शांतीनगर पाइपलाईनलगत बृहन्मुंबई रस्त्याचे काम सुरू असल्याने ५०० मी.मी. व्यासाची पाइपलाईन बाधित होणार असल्यामुळे सदर पाइपलाईन स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे २९ ते ३० जानेवारी दरम्यान २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

याबाबत स्थानिकांनी महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान शांतीनगर, न्यू आझाद नगर, संजय नगर, गोविंद नगर, सहयोग नगर परीसर, बिलालनगर परीसर, पिराणीपाडा, गैबीनगर परिसर, गुलजारनगर परिसर, अन्सारनगर, किदवाईनगर, खाण कंपाऊंड, गणेश सोसायटी, जोहर रोड परिसर, नदीयापार परीसर, भाजी मार्केट रोड, न्हावी पाडा, मर्चट सायजिंग परीसर, सत्तार टेकडी परीसर या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in