महास्वच्छता अभियानांतर्गत २६१ मेट्रिक टन कचरा, डेब्रिज जमा

महास्वच्छता अभियानांतर्गत २६१ मेट्रिक टन कचरा, डेब्रिज जमा

महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार 'फ' प्रभाग क्षेत्रामध्ये श्री गणेश मंदिर संस्थान येथून या अभियानाची सुरुवात होऊन, १० प्रमुख रस्त्यांवर ही डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात आली.

डोंबिवली : स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त कल्याण डोंबिवली शहरासाठी महानगरपालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता अभियान महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्र परिसरात टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार 'फ' प्रभाग क्षेत्रामध्ये श्री गणेश मंदिर संस्थान येथून या अभियानाची सुरुवात होऊन, १० प्रमुख रस्त्यांवर ही डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात आली.

या डीप क्लिनिंग मोहीममध्ये श्री गणेश मंदिर संस्थान परिसर व १० मुख्य रस्ते, महापालिका स्वच्छता कर्मचारी व २०० कंत्राटी कर्मचारी यांच्याद्वारे बांबू झाडू व ब्रशद्वारे स्वच्छ करून घेण्यात आले आणि त्यानंतर स्वच्छता करण्यात आलेले रस्ते, फुटपाथ, डिव्हायडर अशा ठिकाणे ३ टँकरद्वारे पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आले. मागील ३ आठवड्यात दर शुक्रवारी विविध प्रभागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २६१ मेट्रिक टन कचरा, धूळ आणि डेब्रिज जमा करण्यात आले आहे. दिवसभरात ६/फ प्रभागक्षेत्रातील स्वच्छता कर्मचारी, सफाई साठीची साधने, कचरा संकलन आणि वाहतूक यंत्रणा, पाण्याचे टँकर आणि विशेष करून २ धूळशमन वाहने या यंत्रणेमार्फत प्रभागातील १० मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. मोहिमेत माजी पालिका सदस्य मंदार हळबे, राहुल दामले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त धैर्यशील जाधव, फ प्रभागाचे सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप, श्री गणेश मंदिर संस्थानचे सचिव प्रवीण दुधे, विवेकानंद फाऊंडेशनचे अनिल मोकल, ऊर्जा फाऊंडेशनच्या मेधा गोखले, श्री लक्ष्मीनारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे, सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, महापालिका स्वच्छता कर्मचारी व कंत्राटदार यांचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक, युवक मंडळे आणि मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in