२७८ विद्यार्थी ११ वी प्रवेशापासून वंचित; आदिवासी विद्यार्थींचे पालक चिंतेत

आदिवासी विकास प्रकल्प जव्हार कार्यालयाकडे प्रवेशाकरिता इंग्रजी मीडियम कॉलेज मिळावे, याकरिता अर्ज सादर केलेले आहेत
 २७८ विद्यार्थी ११ वी प्रवेशापासून वंचित; आदिवासी विद्यार्थींचे पालक चिंतेत

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत शिक्षण देण्यात येत आहे, मात्र दहावी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर याच प्रकल्पातील २७८ विद्यार्थी हेराहिले आहेत. त्यांना कोणत्याही इंग्रजी मीडियम कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने जव्हार मोखाडा विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थींचे पालक चिंतेत सापडले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारच्या कार्यक्षेत्मधील प्रवेश न मिळालेल्या या विद्यार्थींनी व त्यांच्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार कार्यालयाकडे प्रवेशाकरिता इंग्रजी मीडियम कॉलेज मिळावे, याकरिता अर्ज सादर केलेले आहेत, मात्र कोणत्याही इंग्रजी मीडियम कॉलेजमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगत २७८ विद्यार्थ्यांपुढे अंधार पसरला आहे. याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांच्याशी या पालकांनी चर्चा केली व हा प्रश्न सोडविण्याची मगाणी करून निवेदन दिले आहे.

शिक्षणाचा हक्क या तरतुदीनूसार विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी,शासनाकडून इंग्रजी माध्यमातून गावखेड्यापाड्यांतील विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत, मात्र सद्यस्थितीत मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. २७८ विद्यार्थी आज गेल्या तीन महिन्यांपासून ११ वी प्रवेशाकरिता वंचित राहिलेले आहेत. दरम्यान, प्रकल्पाकडे विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता व शाळा मिळण्याकरिता अर्ज सादर केलेले आहेत. प्रकल्पाकडून त्याची पुढील कार्यालयात पाठवणी केली आहे. मात्र, तेथून याबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याचे समजते.

एकीकडे शासन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता लाखो रुपये खर्च करत आहे. त्याकरिता जी नाही ती उपाययोजना केली गेली. मात्र त्याच देशातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in