वसईलगतच्या २९ गावांचा वसई-विरार महापालिकेत समावेश, अधिसूचनेविरोधात पुढील ३० दिवसांत नोंदविता येणार हरकती

सन २००९ पासूनच पालिके लगतची काही गांवे महापालिकेत समाविष्ट करू नये, म्हणून 'गांव बचाव'चा नारा देत, वसईत मोठे आंदोलन उभे राहिले होते.
वसईलगतच्या २९ गावांचा वसई-विरार महापालिकेत समावेश, अधिसूचनेविरोधात पुढील ३० दिवसांत नोंदविता येणार हरकती

वसई/वार्ताहर : वसई तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम पट्ट्यातील २९ गावे अखेर वसई विरार महापालिकेतच राहणार असून, सन २००९ पासून गाव समर्थक नेते आणि संघटनांनी अवलंबलेला 'गांव बचाव'चा लढा नाट्यमयरित्या संपुष्टात आला आहे.

आधी राज्यातील विविध सरकारांच्या विरोधात जनआंदोलने आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिकाद्वारा ही गांवे महापालिकेत समाविष्ट करू नये, म्हणून लढा सुरु होता. विशेष बाब म्हणजे गाव वगळण्या संदर्भातील एका महत्वाच्या याचिकेवरील अंतिम सुनावणी उद्या, शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार आहे. मात्र पूर्वसंध्येलाच आज, गुरुवारी राज्य सरकारने ही गावे महापालिकेचे समाविष्ट करण्याचा मुहूर्त साधून, गांव समर्थक नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही २९ गांवे वसई विरार महापालिकेत समाविष्ट करीत असल्याची अधिकृत अधिसूचनाच शासनाने प्रसिद्ध केली आहे.

सन २००९ पासूनच पालिके लगतची काही गांवे महापालिकेत समाविष्ट करू नये, म्हणून 'गांव बचाव'चा नारा देत, वसईत मोठे आंदोलन उभे राहिले होते. शासनावर आलेल्या प्रचंड दाबावानंतर राज्य शासनाने २०११ साली वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा अघ्यादेश काढला होता. त्याला वसई विरार महाालिकेने आव्हान देत स्थगिती मिळवली होती. तेव्हापासून गावे वगळण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

मात्र वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याऐवजी ही गावे महापालिकेतच कायम ठेवण्याची नवीन भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने घेतली होती. त्यानुसार २०११ मध्ये वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा शासन निर्णय विखंडीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पत्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयात पत्र सादर केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र गुरुवारीच शासनाने २९ गावे महापालिकेतच समाविष्ट करत असल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेविरोधात पुढील ३० दिवसांत हरकती नोंदविता येणार आहे. शासनाने ही अधिसूचना प्रसिद्ध केल्याने उद्या उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या शासनाच्या भूमिकेवर गांव समर्थक नेते आणि संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, त्याचेही पडसाद उदयाच्या न्यायालयातील सुनावणी दरम्यान उमाटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

१.आगाशी

संपुर्ण “आगाशी" गावाचे महसुली क्षेत्र

२. कोफ्राड

संपुर्ण "कोफराड” गावाचे महसुली क्षेत्र

३. बापाणे

संपुर्ण "न बापाणे " गावाचे महसुली क्षेत्र

४. सुनवघर

५. भुईगाव बु.

६. भुईगाव खु.

७. गास

८. गिरीज

संपुर्ण "ससुनवघर” गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण “ भुईगांव बु." गावाचे महसुली क्षेत्र

संपूर्ण “भुईगाव खु.” गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण "गास " गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण “गिरीज " गावाचे महसुली क्षेत्र

९. कौलार बु.

१०. कौलार खु.

संपुर्ण " कौलार बु.” गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण “कौलार खु.” गावाचे महसुली क्षेत्र

११. नवाळे

१२. निर्मळ

१३. वाघोली

१४. दहिसर

१५. नाळे

१६. राजोडी

१७. अंतर

१८. चांदीप

१९. कशिद कोपर

२०. कसराळी

२१. कोशिंबे

२२. चिंचोटी

२३. देवदळ

२४. काम

संपुर्ण "नवाळे " गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण “निर्मळ " गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण "वाघोली " गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण “दहिसर” गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण "नाळे" गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण "राजोडी " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण " वटार " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण “ चांदीप " गावाचे महसुली क्षेत्र.

संपूर्ण " कशिद कोपर " गावाचे महसुली क्षेत्र

संपुर्ण “कसराळी " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण "कोशिंबे " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण “चिंचोटी " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण "देवदळ " गावाचे महसुली क्षेत्र.

संपूर्ण " कामण " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण " कणेर " गावाचे महसुली क्षेत्र.

संपुर्ण “कोल्ही " गावाचे महसुली क्षेत्र.

२५. कणेर

२६. कोल्ही

२७. मांडवी

संपुर्ण " मांडवी ” गावाचे महसुली क्षेत्र.

२८. शिरसाड

संपुर्ण “शिरसाड " गावाचे महसुली क्षेत्र.

२९. सालोली

संपुर्ण "सालोली " गावाचे महसुली क्षेत्र.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in