एक किलो सीएनजीत ४२ किमी अंतर पार;तेजस हंजनकरचा विश्वविक्रम

तेजसने यापूर्वी मार्चमध्ये मुंबई - मडगाव - मुंबई या जनशताब्दी एक्स्प्रेसला आपल्या मारुती व्हेगेनार मोटारीने मागे टाकत एक नवीन विक्रम नोंदवला आहे
एक किलो सीएनजीत ४२ किमी अंतर पार;तेजस हंजनकरचा विश्वविक्रम
Published on

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणाचे संतुलन राखा व इंधन वाचवा हा संदेश देण्यासाठी दिव्यातील तेजस हंजनकर या तरुणाने कोल्हापूर ते मुंबई असा सीएनजी कारने प्रवास केला. या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापण्याचे लक्ष्य ठेवून कोल्हापूर पेठ सीएनजी पंप ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया असा ३७१ .३४ किलोमीटर अंतर अवघ्या ८.७५ किलो सीएनजी इंधनात पार केले. सरासरी प्रतिकिलो ४२ किमी अंतर पार करून त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

तेजसने यापूर्वी मार्चमध्ये मुंबई - मडगाव - मुंबई या जनशताब्दी एक्स्प्रेसला आपल्या मारुती व्हेगेनार मोटारीने मागे टाकत एक नवीन विक्रम नोंदवला आहे. पेट्रोल - डिझेल सारख्या इंधनांमुळे प्रदूषण वाढून पर्यावरणाचे संतुलन धोक्यात येत आहे. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशाचे नाव उ्ज्वल करण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी इंधन वाचवा हा संदेश देण्यासाठी त्याने दुसरा विक्रम करण्याचा निश्चय केला. त्यानुसार कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापण्याचे लक्ष्य ठेवून कोल्हापूर पेठ सीएनजी पंप ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया असा ३७१ किलोमीटर अंतराचा मार्ग निवडला.

कमी इंधनात जास्त अंतर कापण्याचा विक्रम अमेरिका, जपान या देशांचा आहे. त्यात अमेरिका पहिल्या आणि जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

logo
marathi.freepressjournal.in