उल्हासनगरमधील उद्योगपतीची ४६ लाखांची फसवणूक; एका महिलेसह दोन जणांना अटक

उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता
उल्हासनगरमधील उद्योगपतीची ४६ लाखांची फसवणूक; एका महिलेसह दोन जणांना अटक

उल्हासनगरचे हॉटेल व्यावसायिक आसान बालानी यांनी त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर काढलेल्या बजाज अलायंझ जीवन विमा पॉलिसीमध्ये लाखो रुपये जमा होते. रिलेशनशीप मॅनेजर, ब्रँच मॅनेजर आणि कर्मचारी यांनी बनावट सह्या करून जमा रक्कमेतून नवीन पॉलिसी तयार करीत बालानी यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे.

आसान बालानी यांनी त्यांची आणि पत्नी पूजा बालानी यांची बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. २०३० मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी ४६ लाख ६१ हजार रुपये मिळणार होते. मार्च महिन्यात बजाज अलायंझ कंपनीची एक कर्मचारी आसान बालानी यांच्या घरी आली. त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला.

आसान बालानी यांनी तिला कार्यालयात भेटण्यास बोलावले. तेव्हा ह्या महिलेने आसान बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुनी जीवन विमा योजना सरेंडर करण्याची मागणी केली. त्याला आसन यांनी विरोध केला,असे असताना ही त्या दिवशी तिने जुनी विमा पॉलिसी रद्द करून नवीन जीवन विमा काढला.त्यानंतर तात्काळ आसान बालानी यांनी त्यांची पॉलिसी तपासली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. २०२० मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसान बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्यात मिनू झा यांचा मोबाईल नंबर टाकला. तसेच फोटो ही बदलला. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले. त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कममधून वळते केले होते.

हा प्रकार आसान बालानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in