ठाण्यात ४,७३४ परवानाधारक शस्त्रसाठा जप्त; ५४ शस्त्रधारकांचे परवाने रद्द

विधानसभेची निवडणूक निर्भयपणे पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ४,७३४ परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही कार्यवाही करण्यात आली.
ठाण्यात ४,७३४ परवानाधारक शस्त्रसाठा जप्त; ५४ शस्त्रधारकांचे परवाने रद्द
Published on

ठाणे : विधानसभेची निवडणूक निर्भयपणे पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ४,७३४ परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही कार्यवाही करण्यात आली असून उर्वरित परवाना शस्त्रे जप्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ३९१ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी, ४ हजार ७३४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. तर अद्यापही ३५३ शस्त्रे जप्त करणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ३,९४४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून अटकेचे वॉरंट बजावण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात अतिसंवेदनशील मतदार केंद्र नसून निवडणुकीसाठी दहा हजार पोलिसांची आवश्यकता आहे. यावेळी सहपोलीस आयुक्त दत्ता शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी हे उपस्थित होते.

ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, बँका, महत्त्वाची कार्यालये, संस्था, विद्युत केंद्र, सराफी केंद्रे व इतर महत्त्वाच्या कार्यालयाचे शस्त्र वगळून सर्व परवानाधारक शस्त्रे जप्त करण्याचे कडक आदेश संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले असून शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू आहे.

५४ शस्त्रधारकांचे परवाने रद्द

ठाणे जिल्ह्यात एकूण ७ हजार ३९१ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी, ४ हजार ७३४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. पोलीस अहवालातील वादग्रस्त असलेल्या ५४ शस्त्रधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर अद्यापही ३५३ शस्त्रे जमा करणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in