डोंबिवलीत इमारतीला गेले तडे; तब्बल २४० कुटुंब रस्त्यावर

डोंबिवलीमधील एका इमारतीला तडे गेल्याने एकूण २४० कुटुंब रस्त्यावर आली आहेत
डोंबिवलीत इमारतीला गेले तडे; तब्बल २४० कुटुंब रस्त्यावर

डोंबिवलीमधील लोढा हेवन परिसरात शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका इमारतीला तडे गेल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीमध्ये तब्बल २४० कुटुंब राहतात. शनिवारी रात्री रहिवाशांना एक जोरदार आवाज ऐकू आला आणि त्यामुळे ते तात्काळ इमारतीबाहेर पडले. इमारतीला तडे गेले आहेत, हे लक्षात आल्यानंतर इतर रहिवाशांनाही बाहेर काढण्यात आले. एका रात्रीत तब्बल २४० कुटुंबे रस्त्यावर आल्याने त्यांच्याकडून प्रशासनाने योग्य सोया करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीमधील 'एफ' विंग इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. याचवेळेस इमारतीला तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सोसायटीमधील ५ इमारतींमधील रहिवाशांना घरे खाली करण्यास सांगितले. महापालिका, पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु, या घटनेने पुन्हा एकदा ज्यन्य इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in