ठाणे परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत ; योजनेची अंमलबजावणी सुरू

अंमलबजावणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली असून, ही योजना बुधवारपासून सुरू करण्यात आली.
ठाणे परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत ; योजनेची अंमलबजावणी सुरू

ठाणे : महिलांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला धोरणातंर्गत ठाण्यातील परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व महिलांसाठी ५० टक्के राखीव आसने व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली असून, ही योजना बुधवारपासून सुरू करण्यात आली. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करुन बुधवारी शिवसेनेच्या वतीने ठाणे रेल्वेस्थानक सॅटिस पूल येथे जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के परिवहन व्यवस्थापक विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राजेंद्र साप्ते, मनोज लासे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, गुरमुखसिंग स्यान, पवन कदम, पूजा वाघ, शर्मिला पिंपळोलकर, महिला आघाडीच्या वंदना डोंगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in