जीपी पारसिक बँकेला ५०.६२ कोटी इतका निव्वळ नफा

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या अहवाल वर्षाचा लेखापरीक्षण ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक व सन २०२१-२२चा ५१ वा वार्षिक अहवाल
जीपी पारसिक बँकेला ५०.६२ कोटी इतका निव्वळ नफा

जीपी पारसिक बँकेची आर्थिक परिस्थिती समाधानकारक झाली आहे. बॅँकेचा एकूण व्यवसाय रुपये ६१३५.५७ कोटी व करकपातीनंतरचा निव्वळ नफा रुपये ५०.६२ कोटी इतका झाला आहे. यामुळे निव्वळ नफा रुपये ५०६१.६१ लाख वाटणीसाठी उपलब्ध असल्याची माहिती जीपी पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांनी ५१ वा वार्षिक अहवाल सादर करताना दिली.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या अहवाल वर्षाचा लेखापरीक्षण ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक व सन २०२१-२२चा ५१ वा वार्षिक अहवाल, राम गणेश गडकरी रंगायतन येथील सभागृहात, वार्षिक सर्वसाधारण सभेत नारायण गावंड हे सादर करीत होते. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रणजीत पाटील, संचालक दशरथ घरत, संचालक दशरदादा पाटील, संचालक नामदेव पाटील, संचालक कय्युम चेऊलकर, संचालक नवनाथ पाटील, संचालक केसरीनाथ घरत, संचालक विक्रम पाटील, संचालक डॉ संजय पोपेरे, संचालिका, राजश्री पाटील, तज्ञ संचालक रमाकांत लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसुदन पै आदी मान्यवर उपस्थित होते.

भौगोलिक राजकीय तणावाचा परिणाम बँकिंग उद्योगावर झाला नाही. रिझर्व्ह बँकने बँकांचे रोख राखीव प्रमाण, निव्वळ मागणी आणि वेळेच्या दायित्वाच्या ४.०० टक्क्यांवरून ४.५० टक्क्यांपर्यंत वाढवले. वरील पार्श्वभूमीच्या अनुषंगाने पारसिक बँकेची प्रगती एकंदरीत समाधानकारक झाली. पारसिक बँकेचा एकूण व्यवसाय रुपये ६१३५.५७ कोटी व आर्थिक वर्ष २०२१-२२ अखेर, कर कपातीनंतरचा पारसिक बँकेचा निव्वळ नफा रुपये ५०.६२ कोटी इतका झाला. २०२०-२१च्या तुलनेत सदर निव्वळ नफ्यामध्ये ३०.२० कोटीने वाढ झाली आहे. यामुळे निव्वळ नफा ५०६१.६१ लाख वाटणीसाठी उपलब्ध असल्याची माहिती पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांनी दिली.

यावेळी नारायण गावंड यांच्या हस्ते पारसिक बँकेत २५ वर्ष सेवा घालेल्या ६१ कर्मचारीवृंदांचे सत्कारही करण्यात आले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सरव्यवस्थापक मनोज गडकरी यांनी तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ मधुसूदन दास पै यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in