वासिंदच्या ५५ हजार लोकांची ३९ पोलीस कर्मचाऱ्यांवर मदार

तालुक्यातील २१० चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या वासिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३४ गावे आणि ३ पाडे येतात
वासिंदच्या ५५ हजार लोकांची ३९ पोलीस कर्मचाऱ्यांवर मदार

वासिंद शहर व ग्रामीण परिसरातील असलेल्या ५५ हजार लोकसंख्येची कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची अशी जबाबदारी आहे. परंतु, ठाणे ग्रामीण पोलिसांचे वासिंद येथे फक्त ३९ पोलीस कर्मचारी तैनात आहेत. या अपुऱ्या पोलीस बळाला नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या तुटपुंज्या स्टाफमुळे पोलीस स्टेशनमध्ये काम करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे येथील पोलिसांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. शहरीकरण होत असलेल्या वासिंदची वाढती लोकसंख्या पाहता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी येथे आणखी जादा २० पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे पोलीस निरिक्षकांनी ग्रामीण पोलीस अधिक्षकांना कळविले आहे.

तालुक्यातील २१० चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या वासिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३४ गावे आणि ३ पाडे येतात. पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकंदरीत ५५ हजार इतकी लोकसंख्या आहे. या लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस निरिक्षक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक २, उपनिरीक्षक १, पोलीस हवालदार व पोलीस शिपाई ३५, व यांत महिला पोलीस शिपाई १२ असा एकूण पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ येथे कर्तव्य बजावत आहेत.

पोलीस ठाण्याची इमारत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहत बांधण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वासिंद पोलिसांच्या निवासस्थानाचा हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सण असोत की उत्सव लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत चौवीस तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीसांना सरकारी घरे नसल्याने त्यांना भाडेतत्वार रूम घेऊन राहावे लागत आहे. तथापि नवीन पोलीस ठाण्याची इमारत व निवासस्थानांचा प्रस्ताव वरिष्ठ स्थरावर प्रलंबितच राहिल्याने वासिंद पोलिसांना बैठया चाळीतील अगदी दाटीवाटीत असलेल्या खोल्यांमधून पोलीस स्टेशनचे कामकाज पाहावा लागत आहे. यामुळे जागेअभावी पोलिसांची प्रचंड गैरसोय होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या हक्काचे सरकारी घराचे स्वप्न अपूर्ण राहीले असूनइमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षे लालफितीत

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील शहापूर तालुक्यातील संवेदनशील असलेल्या वासिंद पोलीस स्टेशन इमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षे लालफितीत अडकून पडलेला आहे. एकिकडे पोलीस स्टेशन इमारती अभावी या कार्यालयाचे कामकाज हे एका जुन्या अशा धोकादायक बैठ्या चाळीतून चालविले जात आहे, तर दुसरीकडे येथील पोलिसांना राहायला पण सरकारी निवासस्थाने नसल्याचे वास्तव उजेडात येत आहे. येथे अगदी जीव मुठीत घेऊन रात्रंदिवस पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते आहे. ते सरकारी घराच्या प्रतिक्षेत आहेत.

येथे बैठ्या चाळीत असलेल्या पोलीस ठाण्याच्या जागेवर पुर्वी पोलीस दूरक्षेत्राची चौकी होती. या दुरक्षेत्राला पाच वर्षांपूर्वी पोलीस स्टेशनचा दर्जा देण्यात आला आहे. येथील एकूण ३९ गुंठे जागा पोलीस स्टेशनच्या नावावर आहे. या जागेवर वासिंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारती उभारणी बाबतचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.

- सुदाम शिंदे, पोलीस निरिक्षक, वासिंद पोलीस स्टेशन.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in