मध्य प्रदेशातून ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण; कल्याणमध्ये धागेदोरे, शिक्षकासह सहा जणांना अटक

मध्य प्रदेशातून ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण; कल्याणमध्ये धागेदोरे, शिक्षकासह सहा जणांना अटक

अटक केलेल्यांमध्ये मुंबईतील एका रुग्णालयात काम करणारा अटेण्डंट, शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी, एक रिक्षाचालक, या रिक्षाचालकाच्या शेजारी राहणारे दाम्पत्य आणि पनवेल येथील शिक्षक यांचा समावेश

डोंबिवली : मध्य प्रदेशात एका सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना ६ मे रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील पनवेल येथील एका शिक्षकाला सहा महिन्याचे बाळ पाहिजे होते. त्यासाठी त्याने २९ लाख रुपये खर्च केले. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून अपहरण झालेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये मुंबईतील एका रुग्णालयात काम करणारा अटेण्डंट, शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी, एक रिक्षाचालक, या रिक्षाचालकाच्या शेजारी राहणारे दाम्पत्य आणि पनवेल येथील शिक्षक यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मेच्या रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सिव्हल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरून एका बाळाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. फेरीचे काम करणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फूटपाथवर झोपली असताना दोन अज्ञात दुचाकीस्वार दाम्पत्याजवळ आले. ते सहा महिन्याच्या बाळाला जबदरस्तीने घेवून फरार झाले. याप्रकरणी दाम्पत्यांनी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे तपासत अपहरणकर्त्यांना अटक केली. या कालावधीत बाळाला महाराष्ट्रात आणण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी कल्याणमधील नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्यांना बाळ दिला असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांना सांगितले.

मध्यप्रदेशातील पोलिसांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. मध्य प्रदेश पोलीस कल्याणला पोहचले. येथे सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार करण्यात आली आणि खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांना या दोघांना सांगितले की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षाचालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेतले असता तो म्हणाला, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला दिले. या पती पत्नीला ताब्यात घेतले असता त्यांनी सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिल्याचे सांगितले. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in