वर्षभरात ७२ मुहूर्त, साखरपुड्यासाठी बाराही महिने पोषक; यंदा लग्नसराई जोमात

ऑगस्ट ते दिवाळीपर्यंत मुहूर्त नसून थेट नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ मुहूर्त आहेत. एकंदर २०२४ या वर्षभरात ७२ मुहूर्त असून या सिझनमध्ये ५३ मुहूर्त आहेत.
वर्षभरात ७२ मुहूर्त, साखरपुड्यासाठी बाराही महिने पोषक; यंदा लग्नसराई जोमात
Published on

ठाणे : नव्या वर्षाला सुरुवात होत असतानाच आम्ही लग्नाळू म्हणणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे यंदाच्या वर्षात तब्बल ७२ मुहूर्त असल्याने लग्नसराई जोमात असे चित्र पहावयास मिळणार आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीच्याच जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत तब्बल ५३ विवाह मुहूर्त असून यातील सर्वाधिक जानेवारीत १२ आणि फेब्रुवारीत १३ मुहूर्त आहेत. तर मे आणि जूनमध्ये प्रत्येकी केवळ २ मुहूर्त आहेत. त्यामुळे यंदा ज्यांचे कर्तव्य आहे, अशा मंडळींना जानेवारी-फेब्रुवारीतच बॅण्डबाजा-बारात करण्याची चांगली संधी आहे. तर साखरपुड्यासाठी वर्षाच्या बाराही महिने भरपूर मुहूर्त आहेत. दिवाळीत तुलसी विवाहानंतर या सिझनचे विवाह होण्यास सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात लग्नाचे अनेक मुहूर्त असून सर्वाधिक मुहूर्त जानेवारीत १२, फेब्रुवारीत १३ या दोन महिन्यांत आहेत. त्यामुळे या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर विवाह होणार असून त्यामुळे सोन्या-चांदीचे ज्वेलर्स, कपडा बाजार, हॉलवाले, कॅटरर्सवाले, बँडबाजेवाले, पत्रिका छपाईवाले, फोटोग्राफर, डेकोरेटर्स आदी अनेक जणांच्या हातांना काम मिळणार आहे. कारण त्यानंतर मार्चमध्ये ८, एप्रिलमध्ये १०, मे मध्ये २, जूनमध्ये २ आणि जुलैमध्ये ६ विवाह मुहूर्त आहेत. यानंतर ऑगस्ट ते दिवाळीपर्यंत मुहूर्त नसून थेट नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ मुहूर्त आहेत. एकंदर २०२४ या वर्षभरात ७२ मुहूर्त असून या सिझनमध्ये ५३ मुहूर्त आहेत.

logo
marathi.freepressjournal.in