उल्हासनगरातील शिंदे गट सुसाट ; आतापर्यंत 8200 सत्यप्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी पूर्वी 5100 सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले होते, आता पुन्हा त्यांनी 3100 जणांचे सत्य प्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्पुद केले
उल्हासनगरातील शिंदे गट सुसाट ; आतापर्यंत 8200 सत्यप्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

उल्हासनगर शहरामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ माजी शिवसेना नगरसेवक व सध्या शिंदे समर्थक असलेले राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी पूर्वी 5100 सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले होते, आता पुन्हा त्यांनी 3100 जणांचे सत्य प्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्पुद केले. आजवर भुल्लर यांचेकडून एकुण 8200 सत्य प्रतिज्ञापत्र देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे उल्हासनगर शहरांत शिंदे गट सुसाट असल्याची चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र राज्यातील मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. यामागे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आहे, असे राजेंद्र सिंह भुल्लर यांचे म्हणणे असून उल्हासनगर शहरातून देखील असा असाच प्रचंड प्रतिसाद शिंदे साहेबांना मिळत असल्याचे या प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) व युवानेता विक्की (भाई ) भुल्लर यांचा नेतृत्वखाली उल्हासनगर येथील माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना सचिव व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले. तसेच 8200 सत्यप्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपूर्त केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in