पोलीस आयुक्तालयात ९९६ नवीन पोलीस कर्मचारी दाखल

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये नवीन पोलीस भरती करण्यात आली होती
पोलीस आयुक्तालयात ९९६ नवीन पोलीस कर्मचारी दाखल

भाईंंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये नवीन पोलीस भरती करण्यात आली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांना भरती झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, त्यामुळे नवीन भरती झालेले ९९६ पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात ९९६ नवीन कर्मचारी प्राप्त होणार असल्याने आयुक्तलयातील मनुष्य बळाची संख्या वाढणार असून वाहतूक विभागासह पोलीस ठाण्यातील बराच कामाचा ताण कमी होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in