

भिवंडी : कार चालकाने २ वर्षांच्या मुलाला दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथील खाडीपार रोडवर घडली आहे.मोहम्मद इब्राहीम असरब अन्सारी (२) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.या अपघात प्रकरणी चालक कलीम युनुस सय्यद याच्याविरोधात निजामपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता खाडीपार रस्त्यावरील मुंब्रा बिल्डिंगखाली मोहम्मद अन्सारी हा खेळत असताना कार चालक कलीमने चिमुकल्या मोहम्मदला जोरात धडक दिली. यात मोहम्मदच्या इब्राहिमच्या डोक्यास व डोळ्याजवळ गंभीर जखम होऊन अतिरक्त स्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही सदर अपघाताची खबर निजामपूरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या अपघात प्रकरणी यासीन नसीर अन्सारी यांच्या फिर्यादीवरून निजामपूरा पोलिस ठाण्यात कलीमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चालक कलीम यास नोटीस देवून सोडले आहे.पुढील तपास पोउनि कोळी करीत आहेत.