ठाण्यात इमारतीवर वीज पडली

या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली. ही आग त्वरित विझवण्यात आली.
File photo
File photo
Published on

ठाणे : ठाणे, पालघरमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. ठाण्यात एका इमारतीला वीज पडून आग लागल्याची घटना घडली, तर पालघरमध्ये एका रस्ते अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला.

भिवंडी-निजामपूर मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी साखिब खरबे यांनी सांगितले की, भिवंडीतील कल्हेर भागातील दुर्गेश पार्क भागात इमारतीच्या प्लास्टिक छताला सकाळी ६.४५ वाजता आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली. ही आग त्वरित विझवण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in