बनावट ॲपल उत्पादने विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा

ॲपल मोबाईल कंपनीचे नाव व लोगो असलेली बनावट उत्पादने विकणाऱ्या मीरारोडमधील चार मोबाईल दुकानांवर पोलिसांनी धाडी टाकून चौघांवर गुन्हे दाखल करत ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला
बनावट ॲपल उत्पादने विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा

भाईंंदर : ॲपल मोबाईल कंपनीचे नाव व लोगो असलेली बनावट उत्पादने विकणाऱ्या मीरारोडमधील चार मोबाईल दुकानांवर पोलिसांनी धाडी टाकून चौघांवर गुन्हे दाखल करत ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ॲपल मोबाईल कंपनीच्या नावाने मोबाईल संबंधित बनावट वस्तू विकल्या जात असल्याप्रकरणी पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे तक्रार आली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय सरक व पोलीस पथकाने २९ फेब्रुवारी रोजी मीरारोडच्या शांती नगर भागातील ४ मोबाईल दुकानांवर धाडी टाकून ॲपल कंपनीच्या नावाने विक्रीस ठेवलेले चार्जर, यूएसबी केबल, एअरपॉड, मोबाईल कव्हर, ॲडॉप्टर, चार्जिंग स्ट्रिप्स, बॅक ग्लास आदी बनावट वस्तू जप्त केल्या. त्याची किमत ३ लाख २ हजार इतकी आहे.

या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात ओम मोबाईलचे प्रवीणकुमार पुरोहित (२१), महादेव मोबाईलचे गोपाराम सुथार (३७), रामदेव मोबाईलचे दिनेशकुमार माली (२१) व आर.टी. मोबाईल दुकानाचे अक्रम खान (२४) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in