ठाणे: समाज कल्याण निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

समाज कल्याण विभागात निरीक्षकपदी कार्यरत असणारा महेश अळकुटे (४०) याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
ठाणे: समाज कल्याण निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाणे: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समाज कल्याण विभागात निरीक्षकपदी कार्यरत असणारा महेश अळकुटे (४०) याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

एका ५३ वर्षीय महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेतील पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने ती मनोधैर्य योजनेंतर्गत राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी समाज कल्याण विभागात गेली होती. यावेळी सदर समाज कल्याण निरीक्षकाने तिचा विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच मजल्यावरील समाज कल्याण निरीक्षक अळकुटे यांच्या कार्यालयात घडल्याचेही या पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. या घटनेचा ठाणेनगर पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in