शिवसेनेच्या शहरप्रमुख विरोधात गुन्हा दखल, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

शुक्रवारी डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत खामकर काही कार्यकर्त्यांसह आले
 शिवसेनेच्या शहरप्रमुख विरोधात गुन्हा दखल, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट अशा दोन्ही बाजूने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याचे आणि भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नुकतेच नियुक्त झालेले डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर शाखेमध्ये भेटी देत आहेत. शुक्रवारी डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत खामकर काही कार्यकर्त्यांसह आले. यावेळी शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे, पवन म्हात्रे हे होते. यावेळी खामकर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला.

खामकर काल शाखेत आले त्यांनी तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा, असे आम्हाला विचारले, तुम्ही सदस्य नोंदणीचे फॉर्म भरले नाहीत का? असे सांगत वाद घालत शिवसेना शाखेवरील नेत्यांचे फोटो असलेला बॅनर काढून टाकला. आमच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर शाखेत असलेली काही महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले, असा आरोप परेश म्हात्रे यांनी केला आहे.

या प्रकारानंतर परेश म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी म्हात्रे यांनी डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात विवेक खामकर यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. खामकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख विवेक खामकर यांच्या विरोधात गुन्हा दखल करत त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी खामकर यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in