मोखाड्यात आढळला कुजलेला मृतदेह

मृतदेह ३० ते ३५ वयोगटातील असून, त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मोखाडा ग्रामीण रूग्णालयात पाठवले आहे.
मोखाड्यात आढळला कुजलेला मृतदेह

मोखाडा : तालुक्यात कारेगावच्या पुढे सार्वजनिक विहीरी जवळच्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत पुरूषाचा मृतदेह आढळला. सदरचा मृतदेह ३० ते ३५ वयोगटातील असून, त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मोखाडा ग्रामीण रूग्णालयात पाठवले आहे. या घटनेची मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा- खोडाळा- विहीगाव या राज्यमार्गावर कारेगावच्या पुढे सार्वजनिक विहीरी जवळच्या नाल्यात एका पुरूषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सदरचा मृतदेह चार ते पाच दिवस पाण्यात असल्याने, तो कुजल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन मोखाडा ग्रामीण रूग्णालयात करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. सदरची घटना हत्या की, आत्महत्या आहे. अथवा अन्य काही कारण आहे. याचा शोध मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते घेत आहेत. दरम्यान, मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह

logo
marathi.freepressjournal.in