खेळताना तोल गेल्याने चार वर्षांच्या बालकाचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

खेळताना तोल गेल्याने चार वर्षांच्या बालकाचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागातील गौरव वुड्स फेजमधील ८ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
Published on

भाईंंदर : मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागातील गौरव वुड्स फेजमधील ८ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गौरव वुड्स फेज २, सी विंग ८०२ मध्ये अब्बास मनसोरवाला हे कुटुंबासह राहतात. त्यांचा ४ वर्षांचा मुलगा मौसीन हा २९ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा शेजारील फ्लॅटमध्ये खेळत असताना गॅलरीतून तोल जाऊन ८ व्या मजल्यावरून खाली पडला. त्याला शासनाच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मीरारोड पोलिसांनी १ मार्च रोजी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in