पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात मोठा स्लॅब कोसळला

डोंबिवली विभागीय तळमजल्यावर असलेल्या आधार कार्ड केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या वर असलेला स्लॅब अचानक कोसळला
पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात मोठा स्लॅब कोसळला

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय तळमजल्यावर असलेल्या आधार कार्ड केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या वर असलेला स्लॅब अचानक कोसळला. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. अतिक्रमण कक्षतील कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरल्याने केंद्रातील सर्व कर्मचारी बाहेर पडले.

डोंबिवली विभागीय कार्यालयात आधार कार्ड काढण्यासाठी नेहमी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी असते. मात्र सोमवारी दुपारच्या दरम्यान सुदैवाने नागरिक नसल्याने दुर्घटना टळली. पडलेला स्लॅब मोठा असल्याने आजूबाजूकडील भितींना तडा गेला. आधार कार्ड केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा यासाठी केंद्रप्रमुख कैलाश डोंगरे यांनी सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान डोंबिवली विभागीय कार्यालय धोकादायक झाल्याने वर्षभरापूर्वीच येथील 'फ' आणि 'ग' प्रभाग क्षेत्र कार्यालयात दुसऱ्या ठिकाणी हलविले होते. फ प्रभाग क्षेत्र पी पी चेंबर येथे तर ग प्रभाग क्षेत्र तुकाराम नगर येथे हलविण्यात आले होते. तर या इमारतीत अतिक्रमण विभाग, नागरी सुविधा केंद्र, आधार कार्ड केंद्र , पत्रकार कक्ष, उद्यान विभाग, जन्म -मृत्यू दाखला आदी विभाग सुरू आहेत. तळमजल्यावर पडलेल्या

स्लॅबबाबत सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणची पाहणी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in