केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, चार कामगार जखमी

बदलापूर पूर्वेतील खरवई एमआयडीसीतील व्ही. के. केमिकल या रासायनिक कंपनीला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली.
केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, चार कामगार जखमी

बदलापूर : केमिकल कंपनीत एकापाठोपाठ एक चार स्फोट झाल्याने गुरुवारी बदलापूर हादरले. यामुळे लागलेल्या भीषण आगीत कंपनी जळून खाक झाली. त्याचप्रमाणे इतर तीन, चार कंपन्या व जवळच्या घरांचेही नुकसान झाले. एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीररीत्या भाजले आहेत.

बदलापूर पूर्वेतील खरवई एमआयडीसीतील व्ही. के. केमिकल या रासायनिक कंपनीला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील बबन मोहिते या कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर आकाश मोरे, प्रवीण रेपाळे, सुरेश गायकवाड व गिरीश कांबळे हे चार कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी दिली. कंपनीत आग लागली, त्याचवेळी कंपनीतील बॉयलर रिॲक्टरचा स्फोट होऊन त्याचे तुकडे वेगाने परिसरात फेकले गेले. चार ते पाच वेळा स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्याचा आवाज सुमारे पाच किमीपर्यंत गेला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in