ठाण्यात उभारणार नवी प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची इमारत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार घोषणा

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची सात मजली नवी इमारत ठाण्यात उभी राहणार असून अशाप्रकारची प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची इमारत बांधणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
ठाण्यात उभारणार नवी प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची इमारत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार घोषणा
Published on

ठाणे : चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची सात मजली नवी इमारत ठाण्यात उभी राहणार असून अशाप्रकारची प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची इमारत बांधणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात येत असलेल्या वसंत विहार या ठिकाणी संस्थेची ही नवी इमारत बांधण्यात येणार असून यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

इमारत बांधण्याचा खर्च हा ठाणे महापालिकेवर पडू नये यासाठी निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव देणार आहे. तर या नव्या इमारतीची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली आहे. ठाण्यातून चांगले आयएएस आणि आयपीएस अधिकारी तयार व्हावेत, यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने १९८७ साली चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली. सुरुवातीला या संस्थेचे स्वरूप अतिशय लहान स्वरूपातील होते. त्यानंतर या संस्थेचा विस्तार वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. सध्या या संस्थेची इमारत वर्तकनगर येथे असून एकाच मजल्यावर सध्या संस्थेचा कारभार सुरू आहे.

या प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी संचालक पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर या संस्थेमध्ये अनेक महत्वाचे सकारात्मक बदल केले. तर विद्यार्थ्यांसाठी अनेक व्याख्याननांचे आयोजन देखील त्यांच्या कार्यकाळात करण्यात आले. सध्या या प्रशिक्षण संस्थेमध्ये २१० विद्यार्थी आयएएस अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये या ठिकाणी केवळ ठाण्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असल्याने बऱ्याच वेळा त्यांच्या राहण्याची गैरसोय होत असते. याशिवाय या ठिकाणी जागाही अतिशय अपुरी असल्याने अनेक गैरसोयींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असल्याने आता या संस्थेची नवी इमारत उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

वर्तकनगर येथील संस्थेचा कारभार हा सरनाईक यांच्याच मतदार संघातील वसंत विहार या ठिकाणी जी नवी सात माजली इमारत बांधण्यात येणार आहे त्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात येणार आहे. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता ठाणे महापालिकेला हा खर्च झेपणे शक्य नसल्याने या निधीसाठी शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

२०० रूमचे वसतिगृह आणि सुसज्ज ग्रंथालय

वसंत विहार या ठिकाणी जी सात माजली नवी इमारत उभी राहणार आहे त्या इमारतीमध्ये २०० सुसज्ज रूम बांधण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत मोठे ग्रंथालय, सुसज्ज प्रशिक्षण हॉल, आणि इतर सर्वच सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक महादेव जगताप यांनी दिली आहे.

देवीदास राठौड डायरेक्टर नियर बाई प्लॉट यांचा मुंबई हॉटेल कोहिनूर येथे द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ युएसए (फॉर ग्लोबल पिस) यांच्याकडून रिअल इस्टेट अँड बिजनेस मॅनेजमेंटमध्ये बिजनेस क्षेत्रातील डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झाली.

logo
marathi.freepressjournal.in