उल्हासनगर महापालिकेच्या ताफ्यात नवीन रोबोटिक मशीन दाखल

उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागणीनुसार सॉलिनेस इंटीग्रिटी या कंपनीमार्फत सीएसआर फंडातून ५५ लाखांची रोबोटिक मॅनहोल क्लीनिंग सोल्युशनचे उद‌्घाटन आमदार कुमार आयलानी आणि पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
उल्हासनगर महापालिकेच्या ताफ्यात नवीन रोबोटिक मशीन दाखल
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागणीनुसार सॉलिनेस इंटीग्रिटी या कंपनीमार्फत सीएसआर फंडातून ५५ लाखांची रोबोटिक मॅनहोल क्लीनिंग सोल्युशनचे उद‌्घाटन आमदार कुमार आयलानी आणि पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

उल्हासनगर महानगरपालिकेकडे तीन रोबोटिक मॅनहोल क्लीनिंग मशीन असून त्यात अजून एक नवीन मशीन दाखल झाली असून या मशीनद्वारे शहरातील भुयारी गटारे तसेच चेंबर्स साफ सफाईची कामे करण्यात येणार आहे.

याप्रसंगी आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, पाणीपुरवठा विभागाचे परमेश्वर बुडगे, प्रभाग अधिकारी मनीष हिवरे आणि जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in