ठाण्यात देहव्यापार करणाऱ्या मसाज पार्लरवर धाड

बाहेरून स्पा मात्र आतमध्ये भलतेच धंदे सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर स्पाचालक आणि मॅनेजर यांना अटक करण्यात आली आहे.
ठाण्यात देहव्यापार करणाऱ्या मसाज पार्लरवर धाड

ठाणे: कासारवडवली भागात एका आलिशान इमारतीमध्ये स्पाच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून देहव्यापार सुरू असणाऱ्या मसाज पार्लरवर धाड टाकली.

बाहेरून स्पा मात्र आतमध्ये भलतेच धंदे सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर स्पाचालक आणि मॅनेजर यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कासारवडवली परिसरात वेलनेस थाय स्पा या नावाचे सलून आहे. स्पाच्या नावाखाली या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू होता. परराज्यातील मुलींना वेश्याव्यवसासाठी येथे आणले जात होते.

या प्रकरणाची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक बनावट ग्राहक पाठवून स्पाचे पितळ उघडे करण्यात आले. पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी मुलींना भाग पाडले असल्याचे प्राथमिक चौकशीतून लक्षात आले आहे. दरम्यान, ७ महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून पोलिसांनी स्पा मॅनेजर आणि चालक यांना अटक केलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in