भरधाव टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार; टँकरचालक फरार

मार्गाने अवजड वाहनांनी महाराष्ट्र व गुजरातच्या सिमावर्ती भागातही वाहतूक केली जाते.
भरधाव टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार; टँकरचालक फरार

पालघर : डहाणू चरोटी मार्गावर धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले नुकताच या रस्त्यावर रविवारी वधना येथे एका अवजड टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. ओमकार संजय मोरे (२५) असे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात घडताच टँकरचालक पळून गेला असून कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विशेषतः डहाणू प्रकल्पामधून निघणाऱ्या राखेची वाहतूक वाणगांव ते चारोटी व डहाणू खाडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होते. हे रस्ते बहुतांश अरूंद आहेत, त्यावर आयवासारख्या अवजड ट्रकची वाहतूक वाढली. असून दररोज ७० ते ८० अवजड वाहने, प्रवासी वाहने, लहान-मोठ्या शेकडो गाड्या या मार्गावर धावतात.याच मार्गाने अवजड वाहनांनी महाराष्ट्र व गुजरातच्या सिमावर्ती भागातही वाहतूक केली जाते.

logo
marathi.freepressjournal.in