दिव्यात लिफ्टच्या मोकळ्या जागेत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी
दिव्यात लिफ्टच्या मोकळ्या जागेत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
Published on

डोंबिवली : दिव्यात मुंब्रा देवी कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीत लिफ्टसाठी ठेवण्यात आलेल्या मोकळ्या जागेत पाणी साचले होते. याच पाण्यात बुडून बिल्डिंगमधील तीन वर्षीय दीक्षा सहानीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दीक्षाच्या मृत्यूप्रकरणी विकासकाला जबाबदार धरून त्याच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

याबाबत मुंडे म्हणाले, दिवा शहरात अनेक ठिकाणी विकासक लोकांकडून रूम विकल्यानंतर लिफ्टसाठी पैसे घेतात. परंतु ती लिफ्ट वर्षोनुवर्षे बांधली जात नाही. त्यामुळे हे लिफ्टचे ओपन पॅसेज असेच उघडे राहत असून त्यामध्ये पडून अशा दुर्घटना घडत असतात. या इमारतीत देखील लिफ्टच्या मोकळ्या जागेत कोणतेही सुरक्षेचे नियोजन विकासकाने केले नसल्याने त्या डगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते व त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी दीक्षा रामनाथ सहानी तीन वर्षीय मुलीचा त्यात पडून दुर्दैव मृत्यू झाला. अशा बेजबाबदार विकासकावर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर या विकासकावर गुन्हा दाखल झाला नाही तर दिवा शहरात मोठे आंदोलन करू असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in