पाठीवर ‘स्टार’ असलेले कासवाला प्राणिमित्रांचे जीवनदान

रस्त्यातून प्राणी मित्र भूषण पवार आणि तुषार चव्हाण यांना आढळून आल्यावर त्यांनी वनविभागाला दिले
पाठीवर ‘स्टार’ असलेले कासवाला प्राणिमित्रांचे जीवनदान
Published on

पाठीवर ‘स्टार’ असलेले कासव घरी ठेवणे भाग्यशाली समजले जाते. अशाच समजापोटी स्टार कासवांची अवैध विक्री वाढली आहे. वन्यजीव कायद्याप्रमाणे हे कासव दुर्मिळ प्राण्यांच्या वर्गात मोडतात आणि त्यांची विक्री किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. असेच एक कासव डोंबिवली येथून रस्त्यातून प्राणी मित्र भूषण पवार आणि तुषार चव्हाण यांना आढळून आल्यावर त्यांनी वनविभागाला दिले.

प्राणिमित्र तुषार चव्हाण ह्यांना डोंबिवली येथील एकता नगर परिसरात हे कासव वावरतांना आढळून आले. इतर कासवांपेक्षा हे कासव थोडे वेगळे असल्यांने त्यांनी पॉज संस्थेचे प्राणिमित्र भूषण पवार ह्यांना त्वरित त्याची छायाचित्रे पाठवली. कासव हा संरक्षित प्रजातीमध्ये मोडत असल्याने भूषण पवार ह्यांनी त्वरित हे कासव रेस्क्यू करून वनविभागाच्या स्वाधीन केले. धनलाभ अश्या अंधश्रद्धेपोटी लोक ही कासवे पाळत असतात पण संबंधित प्रजाती ही संरक्षित जातीत मोडत असल्याचे कळतात त्यांना सोडून देण्यात येते. काळ्या बाजारात ह्याच कासवांची किंमत ही लाखो रुपये आहे असे भूषण पवार यांना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in