जव्हारमध्ये फिरते संग्रहालय नागरिकांच्या भेटीला

२१ जून व बुधवार दिनांक २२ जून २०२२ अश्या दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत फिरते संग्रहालयाचे आयोजन करण्यात आले
 जव्हारमध्ये फिरते संग्रहालय नागरिकांच्या भेटीला

गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार दिनांक २१ जून व बुधवार दिनांक २२ जून २०२२ अश्या दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत फिरते संग्रहालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

बस १ सी. एस. एम. वी. एस. ची १०० वर्षे (शताब्दी प्रदर्शन) १० जानेवारी २०२२ रोजी, सी. एस. एम. वी. एस. ने आपला १०० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे आणि हे प्रदर्शन संग्रहालयाच्या समृद्ध संग्रहाची आणि सांस्कृतिक ठेवणाची एक झलक आहे. बस २ - 'ऐका हो ऐका' ध्वनी ते संगीता पर्यंतचा प्रवास हे प्रदर्शन संगीताच्या वैज्ञानिक आणि सौंदर्यात्मक पैलूंमध्ये पूल बांधण्याच काम करते, ज्यामुळे प्रेक्षकांना विविध वाद्यांशी संवाद साधण्याचा अनुभव घेता येतो.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई ही देशातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संस्था आहे. १९०९ सालच्या ॲक्ट ऑफ लेजिस्लेशन स्थापित झालेली ही विनाफायदा तत्त्वावरील एक स्वायत्त संस्था आहे. शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून आपल्या सांस्कृतिक वारसाची ओळख दर्शक अनुकूल संग्रहालयात द्वारे करून देऊन त्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे या संग्रहालयाचे ध्येय आहे. सदर संग्रहालया तर्फे निरनिराळ्या सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम विविध विषयावरील प्रदर्शनी आयोजित केले जातात यातील काही कार्यक्रम आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहयोगाने राबवले जातात अनेक शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांद्वारे एक अनौपचारिक शैक्षणिक केंद्र बनवण्यासाठी तसेच सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी हे वस्तुसंग्रहालय प्रयत्नशील आहे.

यामध्ये दोन बसेसची व्यवस्था केली असून सदर बसमध्ये विविध ऐतिहासिक, कलाविषयक, शास्त्रीय तसेच सामाजिक विषयांवरची मनोरंजक, माहितीपूर्ण व इंटरॲक्टिव प्रदर्शने आहेत.

सदर कार्यक्रमाचा संपूर्ण अनुभव विनामूल्य असून सदर वस्तूसंग्रालय पाहण्याची जव्हार शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले असून सर्वांनी उपस्थित राहून सदर संग्रहालयाचा आनंद घ्यावा असे आवाहन जव्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. आर. मेश्राम यांनी केले आहे. यांतील पहिल्या बससाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सहाय्य केले होते तर सिटी समूहानेही उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक सहकार्य केले.

२०१९ मध्ये सिटी च्या सहाय्याने दुसरी बस यांत सामील केली गेली. या प्रदर्शनाच्या बसेस प्रत्येक भागात फिरविल्या पाहीजेत जेणेकरून िवद्यार्थ्यंाना िवज्ञाबाबत अिधक मािहती िमळण्यास आिण िवद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in