लोकांच्या समस्यांचे निराकरण करतो तो खरा लोकसेवक; गिरीष महाजन यांनी व्यक्त केले मत

खोपटा गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकांच्या समस्यांचे निराकरण करतो तो खरा लोकसेवक; गिरीष महाजन यांनी व्यक्त केले मत

उरण : खोपटा गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी लोकांचा सेवक म्हणून उरणचे आमदार महेश बालदी व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून लोकसेवक कसा असावा, हे खोपटा गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व बांधपाडा, आवरे, पिरकोणसारख्या इतर खेडेगावात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी त्यांनी दाखवून दिले असल्याचे गौरव उद्गार गिरीष महाजन यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगभरात भारताला महत्त्व आले आहे. नरेंद्र मोदींमुळेच आयोध्येतील राममंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन गिरीष महाजन यांनी पिरकोन येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे. याचा निश्चित राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटत आहे. आपापल्या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता शासनाच्या योजना स्थानिकांपर्यंत पोहाेचविल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक शेकापचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावंड,कलावंती जीवन गावंड यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसमवेत गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत,उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, रा.जि.प.मा. सदस्य विजय भोईर, रा.जि.प.मा. सदस्य ज्ञानेश्वर घरत, पिरकोन सरपंच कलावंती पाटील, बांधपाडा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, भाजपचे उरण पुर्व विभाग मा अध्यक्ष हेमंत आत्माराम म्हात्रे, कुलदीप नाईक,समिर मढवी, जितेंद्र घरत, मुकुंद गावंड, संदीप पाटील, विलास पाटील, शशिकांत पाटील, उद्योजक व्ही. एस. पाटील, सुनील पाटील, सुशांत पाटील, चेअरमन प्रदिप नाखवा, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, शहराध्यक्ष कौशिक शहा तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उरणमध्ये विकासकामांचे लोकार्पण

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून डीपी वर्ल्डच्या सीआरएस फंडातून सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून खोपटा गावात उभारण्यात आलेल्या रा.जि.प.च्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा, ३० कोटी रुपये खर्चाच्या पिरवाडी चौपाटीचे सुशोभीकरण, आवरे गावातील तलावाचे सुशोभीकरण, केगाव गावातील रहिवाशांसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यासह इतर विकासकामांचे भूमिपूजन सोहळा राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पिरकोन गावात पार पडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in