भिवंडीत इमारत कोसळून ८ महिन्याच्या चिमुकलीसह महिलेचा मृत्यू, पाच जणांना गंभीर दुखापत

घटनेची माहिती मिळळताच भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
भिवंडीत इमारत कोसळून ८ महिन्याच्या चिमुकलीसह महिलेचा मृत्यू, पाच जणांना गंभीर दुखापत

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एक मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेत एक ९ महिन्याच्या बाळासह एक महिलेचा मृत्तयू झाला असून अन्य पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या ही घटना घडल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भिवंडी शहरातील धोबी तलाव परिसरातील दुर्गा रोडवर सहा फ्लॅट असलेली एकमजली इमारत पहाटे १२:35 वाजता कोसळली,अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली. या घटनेची माहिती मिळळताच भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

मध्ये रात्रीची शोधमोहीम

ही घटना घडल्यानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या सुमारासच शोधमोहीम राबवत सात जणांना ढिगाऱ्याच्या खालून बाहेर काढण्यात आलं. यात एका आठ महिन्याच्या मुलीचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर पाच जणांना गंभीर दुखापत झाली झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उज्मा आतिफ मोमीन(40) आणि सोसर मोमीन (८ महिने) अशी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत.

या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले आहेत. यात चार महिलांचा तर एका ६५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

ही घटना घडल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या बचावकार्य पहाटे ३.३० वाजेला पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही इमारत किती जुनी आहे आणि धोकेदायक इमारतींच्या यादीत या इमरातीचं नाव आहे की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in