केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत महिलेसह मुलाचा मृत्यू

कल्याणमध्ये रस्ता अपघातात केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत एका महिलेचा व तिच्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला.
केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत महिलेसह मुलाचा मृत्यू
Published on

डोंबिवली : कल्याणमध्ये रस्ता अपघातात केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत एका महिलेचा व तिच्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रकाश भोईर यासह मनसैनिकांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. माजी आमदार भोईर यांसह मनसैनिकांनी रस्ता रोको केले. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

निशा सोमेसकर व अंश सोमेसकर असे रस्ते अपघातातात मृत पावलेल्या आई व मुलाचे नाव आहे. माजी आमदार प्रकाश भोईर म्हणाले, कल्याण शहरात रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. कल्याण पत्रीपुलाजवळ रस्ते अपघातात सहा जणांचा जीव गेला. कल्याण शहरातील मुख्य रस्त्याची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचीही आहे.

अपघात घडलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला शाळा असून रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असते. वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्त्यावर लक्ष ठेवून येथील वाहतूक व्यवस्थित होण्याकरता वाहतूक पोलीस नेमावे, अशी आमची मागणी असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in