फलाटावर महिलेला धक्का देणाऱ्या तरुणाला अटक

रेल्वे पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे
फलाटावर महिलेला धक्का देणाऱ्या तरुणाला अटक

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट बघत उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशाची छेड काढण्याचा प्रकार घडला. छेड काढणाऱ्या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहित वरकुटे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. एक महिला प्रवासी डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त आली होती. ही महिला फलाटावर ट्रेनची वाट बघत असताना एका इसमाने तिला धक्का दिला. आधी या तरुणाचा चुकून धक्का लागला असावा, असे महिलेला वाटले. ती महिला तीन नंबरच्या फलाटावरून सात नंबरच्या फलाटावर गेली; मात्र तो तरुण त्या फलाटावरही महिलेचा पाठलाग करत होता. या तरुणाने पुन्हा महिलेला धक्का दिला.

महिला तरुणाला ओरडत असल्याचे पाहून फलाटावर असलेल्या इतर प्रवाशांही त्याला ओरडले. रेल्वे पोलिसांना कळविल्यावर, पोलिसांनी तरुणाला पकडले. रेल्वे पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक तरुणाला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in