बदलापुरात तरुणीवर अत्याचार

एका अल्पपरिचित मैत्रिणीकडे आधारासाठी बदलापुरात आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्याच मित्राने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
बदलापुरात तरुणीवर अत्याचार
Published on

बदलापूर : एका अल्पपरिचित मैत्रिणीकडे आधारासाठी बदलापुरात आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्याच मित्राने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक केली असून त्याला साथ देणाऱ्या मैत्रिणीचा पोलीस शोध घेत आहेत. चार दिवसांपूर्वी मुंबई येथे राहणारी एक तरुणी तिचा आजीसोबत कौटुंबिक वाद झाल्याने रागात घरातून बाहेर पडली. त्यानंतर या तरुणीने काही दिवसांपूर्वी अंधेरी स्थानकावर ओळख झालेल्या बदलापूर येथील मैत्रिणीला संपर्क करून बदलापूरला तिच्याकडे राहण्यासाठी आली. यादरम्यान बदलापूर येथील तरुणीचा रिक्षाचालक असलेला मित्र आणि या दोन्ही तरुणी एका ठिकाणी पार्टीसाठी बसले होते. यावेळी मद्यपान केल्यानंतर या मित्राने पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने घाबरलेल्या पीडित तरुणीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर पीडित तरुणीच्या मैत्रिणीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण वालवडकर यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in