सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी आठ महिन्यांची गरोदर

आपल्या १४ वर्षांच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी आठ महिन्याची गरोदर
सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी आठ महिन्यांची गरोदर

कर्जत : कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जे. के. नगरमधील ४० वर्षीय व्यक्तीने समाजातील बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. आपल्या १४ वर्षांच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी आठ महिन्याची गरोदर आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली आहे.

शेलू गावातील जे. के. नगर या वसाहतीत सलमान अस्लम शेख ही व्यक्ती राहत असून, त्याने हिंदू महिलेसोबत लग्न केले आहे. महिलेचे ते दुसरे लग्न असून, त्या महिलेला पहिल्या नवऱ्यापासून १४ वर्षांची मुलगी आहे. या मुलीचे मूळ गाव हे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील आहे. सलमान अस्लम शेख धर्माने हिंदू असलेली पत्नी आणि सावत्र मुलगी यांच्यासोबत जेके नगरमधील चाळीमध्ये राहत होते. अल्पवयीन असलेल्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत सलमान शेखने सप्टेंबर २०२२ मध्ये मुलीवर जबरदस्तीने अनैतिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. पत्नी घरात नसताना सलमान हा दरवाजा बंद करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बळजबरीने तिच्यासोबत शरीरसंबंध करू लागला.

सध्या ती मुलगी आठ महिन्यांची गरोदर असून, याप्रकरणी मुलीच्या आईने सावत्र पित्याविरोधात तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर मुलगी शेलू येथून नेरळ येथील एका माध्यमिक शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. हा प्रकार समजल्यावर नेरळ पोलिसांच्या पथकाने त्या १४ वर्षीय मुलीची सोनोग्राफी केली असता हे सत्य बाहेर आले आहे. नेरळ पोलिसांनी सलमान अस्लम शेख यास अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in