भिवंडी-वाडा रस्त्यावर धुक्यामुळे अपघात; टँकरचालक जखमी

रधाव वेगात अचानकपणे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर दुभाजकावर धडकला.
भिवंडी-वाडा रस्त्यावर धुक्यामुळे अपघात; टँकरचालक जखमी

भिवंडी : तालुक्यातील कवाड नाका हद्दीत धुक्याची चादर पसरल्याने टँकरचालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्याने झालेल्या विचित्र अपघातात टँकरचालक किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कवाड टोलनाका येथील दुभाजकाची दयनीय दुरवस्था झाली आहे.

शुक्रवारी सकाळी तालुक्यात सर्वत्रच धुक्याची चादर पसरली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास यूपी १५ एफटी ०२२४ हा दुधाने भरलेला टँकर भिवंडी-वाडा रस्त्याने भिवंडीच्या दिशेने जात होता. त्यावेळी टँकर कवाड नाक्यावरील बंद टोलनाक्यावर आला असता, दाट धुक्यामुळे टँकरचालकाला दुभाजकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगात अचानकपणे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर दुभाजकावर धडकला. त्यानंतर टँकरच्या पाठीमागून वेगात आलेल्या टेम्पोने टँकरला धडक दिली.

या विचित्र अपघातात टँकरचालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. जखमी चालकावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in