नरेंद्र मोदी यांच्या एक सूर्य,एक ग्रिड योजनेनुसार सर्वांनी सौर ऊर्जेकडे वळावे - कपिल पाटील

भारत सरकारचे विद्युत मंत्रालय, महावितरण कंपनी यांच्या वतीने शहापूर येथे ऊर्जा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
नरेंद्र मोदी यांच्या एक सूर्य,एक ग्रिड योजनेनुसार सर्वांनी सौर ऊर्जेकडे वळावे - कपिल पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योग दिन म्हणून जगाला दिला. आता जागतिक तापमानवाढ सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एक सूर्य, एक विश्व, एक ग्रिड ही योजना मांडली. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने पसंती दिली असून, अनेक देशांचा पाठिंबा मिळत आहे. त्यादृष्टीकोनातून आपण सर्वांनी सौर ऊर्जेकडे वळावे, असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने `उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य' अंतर्गत भारत सरकारचे विद्युत मंत्रालय, महावितरण कंपनी यांच्या वतीने शहापूर येथे ऊर्जा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील बोलत होते. या वेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, पंचायत समितीच्या उपसभापती कविता भोईर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, अशोक इरनक, सुभाष हरड, रंजना उघडा, नगरसेविका मिताली भोपतराव, विनोद कदम, योगेश महाजन, हरेश पष्टे, महावितरणचे कोकण सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, पॉवर सिस्टीम कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक व्ही. बालाजी आदींची उपस्थिती होती.

असे नमूद करून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील पुढे म्हणाले, ``यापुढील आपण सौर ऊर्जेकडे वळावे. सध्या केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जेसाठी अनुदान दिले जात आहे.

यापुढील काळात ग्रामपंचायतींना जमिनीवर सौर ऊर्जा पॅनल उभारण्यासाठी कमीतकमी २ ते ३ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा विचार केला जात आहे. त्यातून १० वर्षांत ग्रामपंचायतीचे कर्ज फिटेल, तर पुढील १० वर्ष ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकेल.''

केंद्र सरकारद्वारे किनारपट्टी भागात विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in