राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार मोहफुलातून मिळणार योग्य हमीभाव

या भागातील लोकांसाठी एका नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे.
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार मोहफुलातून मिळणार योग्य हमीभाव

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेले जव्हार आणि मोखाडा तालुके, भौगोलिकदृष्ट्या लाभलेली मोठमोठाली जंगले, नद्या, डोंगरदऱ्या या सगळ्यामुळे जंगलामध्ये निसर्ग स्त्रोताने उगवत असलेले मोह झाड, मोठ्या संख्येने वाढत आहेत. कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या मोह झाडाला राज्य शासनाच्या नवनवीन धोरणानुसार मोहफुले गोळा करून ते विक्री केल्यास त्यांना योग्य हमीभाव मिळणार आहे, त्यामुळे या भागातील लोकांसाठी एका नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे.

दोन्ही तालुक्यात जंगलात उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मोहफुलांना आता खऱ्या अर्थाने भाव येणार आहे. या फुलांपासून अधिकृतपणे मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. गुरुवारी (दि.२३) त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यात या देशी मद्याचे विदेशीकरण करण्यामागील भूमिकाही स्पष्ट करण्यात आली.

एकीकडे विदेशी मद्याचा दर्जा, तर दुसरीकडे किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारण्यात येणारा उत्पादन शुल्काचा दर जास्त आहे. त्यामुळे मोहाफुलांपासून निर्मिती होणाऱ्या 'विदेशी' मद्यावर हा दर आकारल्यास मद्याची विक्री किंमत जास्त होईल. त्यातून मद्याच्या विक्रीवर मर्यादा येतील. हे टाळण्यासाठी उत्पादन शुल्क सवलतीच्या दरात आकारले जाणार आहे. आता मोहफुलातून तोकडी कमाई करणाऱ्यांना चांगली मिळकत होईल आणि या भागातील मोहफुले जमा करणाऱ्यांना चांगला मोबदला मिळू लागेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in