फुटपाथवर घाण करणाऱ्या गॅरेजेसवर कारवाई

रस्ते व फुटपाथवर घाण करणारे विकासक व गॅरेज चालक, तसेच यांच्याकडून रस्त्यावर अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर व घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई रुपये दंड आकाराला आहे.
फुटपाथवर घाण करणाऱ्या गॅरेजेसवर कारवाई

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते, फुटपाथ व नाल्यांवर घाण करणाऱ्या गॅरेजेस चालक, विकासक व प्लास्टिक बाळगणारे दुकानदार, फर्निचर, सार्वजनिक जागेवर रस्त्यांवर अस्वच्छता पसरविणाऱ्या वाहने व इतर ठिकाणी घाण करणाऱ्यांवर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ५ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत दंडात्मक कारवाई करून ११ लाख २१ हजार ७५० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर व सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहाही प्रभाग समितीत सर्व १२ स्वच्छता निरीक्षकांना आदेश देण्यात आले होते. रस्ते व फुटपाथवर घाण करणारे विकासक व गॅरेज चालक, तसेच यांच्याकडून रस्त्यावर अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर व घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई रुपये दंड आकाराला आहे.

महापालिकेकडून भाईंदर, जनता नगर, नवघर रोड, जेसल पार्क, बंदरवाडी, नवघर नाका, गोडदेव, हटकेश, कनकिया, नया नगर, शांती नगर, काशी, डोंगरी, सृष्टी, शांती पार्क सह परिसरात ७० गॅरेज प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे ३५ हजार दंड, चार विकासकाला १८ हजार दंड, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पसरविणे, थुंकणे ८२ जणांना दंड ३९ हजार ५०० दंड, फर्निचर दुकानदार यांना ५०० दंड व इतर ठिकाणी कचरा पसरवणे रस्त्यावर गाड्या धुणे व घाण करणे अशा २१७ जणांवर दंड ८४ हजार ७०० रुपये दंड आकाराला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in