थकबाकीपोटी वाहनतळावर केडीएमसी पालिकेची कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकी करणाऱ्या वाहनतळावर कारवाई करण्यात आली.
थकबाकीपोटी वाहनतळावर केडीएमसी पालिकेची कारवाई
Published on

कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकी करणाऱ्या वाहनतळावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कल्याण रेल्वे स्थानकाजवळील बोरगांवकर वाडी वाहनतळ संबंधित ठेकेदाराकडील रु. १,२८,०२,४४०/- इतक्या रकमेच्या थकबाकीपोटी महापालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.

बोरगांवकर वाडी बांधिव वाहनतळ (पे ॲन्ड पार्क) या धरतीवर ३ वर्षाच्या कालावधीकरीता, भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी मे. श्री. समर्थ एंटरप्रायझेस देण्यात आले होते. सदर वाहनतळ पे ॲन्ड पार्क तत्त्वावर सुरू करण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने पहिल्या ३ महिन्याचे भाडे रु. ५९,२०,९७६/- इतकी रक्कम महापालिका फंडात जमा केली होती. त्यानंतर सदर परिचालकाकडून कोणत्याही प्रकारचे भाडे पालिकेला न मिळाल्यामुळे याबाबत बोरगांवकर वाडी वाहनतळाला भाडे भरण्यासाठी नोटीस देण्यात

आल्या होत्या, मात्र पालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवारी अखेर पालिकेने त्यावर कारवाई केली. संबंधित मे.श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांस काळ्या यादीत टाकण्यात आले असून त्यांना अन्य कोणत्याही प्राधिकरणासोबत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in