१०० वर्षे जुनी अतिधोकादायक इमारतीवर कारवाई सुरू

उपायुक्त धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत निष्कासनाची कारवाई करण्यात आली
१०० वर्षे जुनी अतिधोकादायक इमारतीवर कारवाई सुरू
Published on

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांनी कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरातील नजीब मोमेन ही इमारत १०० वर्षे जुनी असल्याने अतिधोकादायक झाली होती. या इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

१०० वर्षे जुनी असलेली नजीब मोमेन हि इमारत मातीची बांधलेली असल्याने अतिधोकादायक झाली होती. केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही इमारत अतिधोकादायक असल्याने गेल्या ६ महिन्यांपासून रहिवासमुक्त करण्यासाठी सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल हे प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून इमारतीतील रहिवाशांनी घरे रिकामी केल्यानंतर या इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in