कळवा पुलाखाली कांदळवनात बांधलेल्या झोपड्यांवर कारवाई

परराज्यातून तसेच ग्रामीण भागातून नागरिक शहारत स्थलांतरित होत असतात आणि त्यानंतर अश्या झोपड्या वाढत असतात
कळवा पुलाखाली कांदळवनात बांधलेल्या झोपड्यांवर कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असून कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर सोमवारी कळवा पुलाखाली कांदळवनात बांधलेल्या अनाधिकृत ५७ झोपड्यांवर आज निष्कासानाची कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अजय एडके, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी अतिक्रमण विभाग व प्रदूषण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने केली. शहराच्या खाडी किनारी लगत दिवसेंदिवस झोपड्या वाढत आहेत. परराज्यातून तसेच ग्रामीण भागातून नागरिक शहारत स्थलांतरित होत असतात आणि त्यानंतर अश्या झोपड्या वाढत असतात. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील होत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in